बीड : बीडमध्ये (Beed) एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये बीडच्या मांजरसुंबा – केज राष्ट्रीय महामार्गावर (Manjarsumba – Cage National Highway) नेकनूर जवळ बाईकचा आणि कारचा भीषण अपघात (Accident) झाला. या भीषण अपघातात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रीय महामार्गामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
काय घडले नेमके?
नारेवाडी येथील विनायक दादाहरी चौरे (Vinayak Dadahari Chaure) आणि विनोद विनायक चौरे (Vinod Vinayak Chaure) हे दोघे बापलेक बीडवरून आपल्या गावाकडे निघाले होते. दरम्यान, नेकनूरपासून काही अंतरावर तळ्याजवळ व्हिस्टा कारचा आणि होन्डा शाईन बाईकचा भीषण अपघात झाला.
या भीषण अपघात बाप लेकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नेकनूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.