BEED CRIME CASE: राज्यात गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बीडमध्येही आता नवनवीन प्रकरण बाहेर येत आहेत.
तुमच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो असं म्हणून संस्थाचालकाला खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकरण आता पुढे आलंय BEED CRIME CASE:
TOP NEWS MARATHI | BEED NEWS:शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या गुंडाचा आणखी एक कारनामा
बीडमध्ये रोज नवनवीन घटना घडताना दिसत आहेत.
आता यातच चक्क संस्थाचालकालाच पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
‘तुमच्या मुलीचे माझ्याकडे अश्लील व्हिडिओ आहेत, आणि ते मी व्हाट्सअप आणि सोशल माध्यमात व्हायरल करणार आहे’, अशी धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली .
त्यांनी एक व्हिडिओही संस्थाचालकाच्या मुलाच्या व्हाट्सअपवर पाठवला. पाच लाखांच्या खंडणी पैकी संस्था चालकाने 16 हजार रुपये दिले. मात्र उर्वरित पैशांसाठी पुन्हा धमकी देण्याचं सत्र सुरू झालं.
या संस्थाचालकांच्या दोन संस्था आहेत तर त्यांच्या पत्नी एका गावची सरपंच आहे.
श्याम वाघमारे हा व्यक्ती सातत्याने काही दिवसांपासून त्रास देतं होता.. या त्रासाला कंटाळून संस्था चालकाने बीड मधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
त्यानुसार श्याम वाघमारे आणि महेश वेताळ या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा संस्थेतील कर्मचारी असून त्याचे नाव महेश वेताळ आहे.
BEED CRIME: बीडमध्ये आणखी एका सरपंचाचा मृत्यू; आंबेजोगाई तालुक्यात एकच खळबळ
महेश वेताळ हा व्हिडिओ कॉलवर संस्थाचालकाच्या मुलीशी बोलत असताना त्याने संगमत करून हा व्हिडिओ इतर कुणाच्यातरी मदतीने रेकॉर्ड केला होता.
तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत श्याम वाघमारे हा खंडणी मागत होता. त्यामुळे कर्मचारी वेताळवरही गुन्हा नोंद झाला आहे.