QR Code : क्यूआर कोड स्कॅन करताय तर सावधान ! तुमचा मोबाईलही होऊ शकतो हॅक

492 0

देशात ऑनलाईन सुविधा सुरु झाल्यापासुन सगळेजण क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करताना दिसत आहेत. यामुळे देशात क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. लोक क्यूआरकोडला जास्त पसंती देताना दिसत आहेत. यूपीआय वर आधारित पैसे देण्याची पद्धत लोकप्रिय ठरली त्यामुळे सहाजिकच सायबरभामटे देखील याकडे वळले आहेत. यामुळे बनावट क्यूआर कोड लावून लोकांचे स्मार्टफोन हॅक करण्याचे प्रमाणदेखील खूप वाढले आहे.

भारतासह अनेक देशांमध्ये हा धोका वाढलाय स्कॅमर्स खरा क्यूआर कोड ऐवजी खोटा कोड चिकटवतात. त्यातून फोन हॅक केला जातो. सर्व माहिती हॅकर्सला मिळते आणि काही क्षणात खाते रिकामे होते एवढेच नव्हे तर तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेल देखील केलं जात या संदर्भात एफबीआयने इशारा दिलाय.खोटे क्यूआरकोड क्रिप्टोकरेन्सी उद्योगातही आहेत.भारत अमेरिकासोबतचं जपान, फ्रान्स ,जर्मनी, नेदरलँड, इत्यादी देशांमध्ये क्यूआर कोड स्कॅमचा धोका अधिक वाढला आहे.

क्यूआर कोड स्कॅम मध्ये फसवणूक कशी होते
रेस्टॉरंट, कॅफे इत्यादी ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करून मेन्यू तुमच्यासमोर येतो. पैसे देण्यासाठीही क्यूआर कोड असतो मात्र खऱ्या ऐवजी स्कॅमर्स खोटा कोड लावतात. तो स्कॅन केल्यावर युजर्स ऑनलाईन मेन्यू किंवा पेमेंट चेकआउटवर नेण्याऐवजी फोनमध्ये मालवेअर टाकले जाते आणि त्यातून वैयक्तिक माहिती चोरली जाते.

त्यामुळे आता फसवणुकीपासून बचाव कसा करायचा जाणून घेऊया
अज्ञात लोकांकडून मिळालेलं क्यूआर कोड स्कॅन करू नका
कोड स्कॅन करताना वेब युआरएल तपासून घ्या
कोड नीट पहा एखाद्या कोडला कव्हर केलेल्या स्टिकर सारखा वाटल्यास स्कॅन करू नका
स्कॅन केल्यानंतर ऑटोमॅटिक लिंक ओपन करण्याचं सेटिंग बंद करा
चुकीचं अक्षर स्पेलिंग पहा

सर्वाधिक क्यूआर कोड स्कॅनिंग प्रमाण कोणत्या देशात किती टक्के आहे
अमेरिका 42.2 टक्के
भारत 16.1 टक्का
फ्रान्स 6.4 टक्के
ब्रिटन 3.6 टक्के
कॅनडा 3.6 टक्के

Share This News
error: Content is protected !!