Solapur Crime News

Solapur Crime News : सोलापूर हळहळलं ! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; दीड वर्षांच्या चिमुकलीचे छत्र हरपलं

3745 0

बार्शी : सोलापूरमधील (Solapur Crime News) बार्शी या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये अज्ञात कारणावरुन पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालुन तिची हत्या केली. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तालुक्यातील जामगाव या ठिकाणी ही घटना घडली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या दाम्पत्याची दिड वर्षांची मुलगी रडत असल्याने व घरातून वास सुटल्यानंतर हे प्रकरण समोर आले. मृत महिलेचे नाव गंगा धनाजी गायकवाड (वय 35) आणि आरोपी पतीचे नाव धनाजी गायकवाड (वय 45) असे आहे.

काय घडले नेमके?
धनाजी गायकवाड हा पहिल्या पत्नीच्या खुनाच्या प्रकरणात पंधरा वर्षाची शिक्षा भोगून चार वर्षांपूर्वी जामगाव येथे राहण्यास आला होता. गंगा हिच्याशी त्याने दुसरा विवाह केला होता. त्यांना दिड वर्षाची मुलगी होती. चायनीज फुडचा व्यवसाय करुन तो कुटुंबाची उपजिवीका चालवत होता. शुक्रवारी (दि. २) रात्री धनाजी याने दिड वर्षाच्या मुली समक्ष पत्नीच्या डोक्यात वरंवंटा घालून खून केला. त्यानंतर स्वत: चे जीवन संपवले. शनिवारी उशिरा घरातून मुलीचा रडतानाचा आवाज येऊ लागल्यानंतर पोलिसात याची तक्रार देण्यात आली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पत्रा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी मृतदेहांच्या जवळच रक्ताने माखलेला चाकु पडलेला होता. तसेच रक्ताने माखलेली रडत असलेली दिड वर्षाची मुलगी देखील आढळून आली. यानंतर पोलिसांनी या दोघांचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील कारवाईला सुरुवात केली.

Share This News
error: Content is protected !!