Love Jihad

Love Jihad : वांद्रे टर्मिनस येथे लव्ह जिहादच्या आरोपाखाली तरुणाला मारहाण

597 0

मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे तरुणीसोबत बाहेर गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या (Love Jihad) आरोपाखाली मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ माजी आमदार वारीस पठाण यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
मंगळवारी मुंबईत वांद्रे स्थानकाबाहेर तरूणीसाठी फिरायला गेलेल्या तरूणाला लव्ह जिहादचा आरोप करत जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये लाल शर्ट घातलेल्या तरुणाला जमावाकडून मारहाण होताना दिसत आहे. त्यावेळी तरूणाची मैत्रीण जमावाला विरोध करत आहे. यानंतर मारहाण झालेल्याव्यक्तीला गंभीर दुखापत झाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर ओढत नेले. त्यानंतर जमावाने ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी आमदार वारीस पठाण यांनी जोरदार टीका केली आहे. मुंबईत अशी घटना घडते ही अतिशय लाजीरवाणी घटना आहे. मुंबई वांद्रे रेल्वे स्थानकावर लव्ह जिहादच्या नावाखाली जेएसआरचा नारा देणाऱ्या हिंदुत्ववादी गुंडांनी एका नि:शस्त्र मुस्लिम मुलाला निर्दयपणे मारहाण केली.तिथे आरपीएफचा कर्मचारी देखील उपस्थित होता, तरी देखील कोणतीही अॅक्शन घेण्यात आली नाही. कायदा हातात देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हा प्रकार घडत आहे. एवढा द्वेष कशासाठी? जर गुन्हा केला असेल तर पोलीस प्रशासन आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाल नाही. माझी मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती आहे की, व्हिडीओमधील तरूणांनर कडक कारवाई करा, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी टीका वारीस पठाण यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!