Pune Fight Video

Pune Fight Video : पुणे रेल्वे स्टेशनवर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी

1095 0

पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण (Pune Fight Video) झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Fight Video) प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हाणामारी करणार्‍या दोघांमधील एक जण दुसर्‍याला डोक्यापर्यंत उचलून-उचलून आपटत होता आणि खाली पडणार्‍या व्यक्तीचे डोके आपटल्याचा जोरजोरात आवाज येत होता.

या घटनेमुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असून, स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच ‘गुंडाराज’ सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!