Aurangbad Firing News

Aurangbad Firing News : औरंगाबाद हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणातून तरुणावर गोळीबार

733 0

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangbad Firing News) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज औरंगाबाद शहर (Aurangbad Firing News) पुन्हा एकदा हादरलं आहे. उधारीचे साडेसात हजार रुपये मागितल्याने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने तरुणाची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली आहे. शहरातील बायजीपुरा भागात ही घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या गोळीबाराच्या घटनेत अजून एकजण जखमी झाला आहे. हमद अब्दुल्लाह सालेह कुतुब चाऊस (वय 24 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, फय्याज पटेल (वय 27 वर्षे, रा. गल्ली क्रमांक 21, बायजीपुरा) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. हि संपूर्ण हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय घडले नेमके?
हल्लेखोर फयाज आणि मृत हमद एकमेकांच्या ओळखीचे होते. हमद हुसेन कॉलनीत आईसोबत राहत होता. तो पैठणगेटच्या कपड्याच्या दुकानात नोकरीला होता. 20 ऑगस्ट रोजी त्याचे लग्न असल्याने तो बुधवारी (9 ऑगस्ट) दुकानातून काम आटोपून लवकर घरी परतला. दरम्यान साडेसहा वाजता तो न्यू बायजीपुऱ्यात टेलरकडे गेला. टेलरला कपड्यांचं माप देण्यासाठी आला होता. त्यानंतर तो एका मित्रासोबत चहा पिऊन, जवळ असलेल्या मेडिकल समोर उभा राहिला होता. त्याचवेळी समोरुन आलेल्या फयाजने गावठी कट्ट्यातून थेट हमदवर गोळीबार केला. पहिली गोळी हमदच्या कानाजवळून गेली आणि मेडिकलवर मुलाला औषध घेण्यासाठी आलेल्या इरफान पठाण यांच्या हाताच्या आरपार गेली. त्यानंतर दुसरी गोळी फयाजने थेट हमदच्या छातीत घातली. ज्यात हमद जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. गोळी मारल्यानंतर हल्लेखार फयाज पटेल पंधरा-वीस सेकंद मृताच्या मृतदेहास लाथाबुक्क्यांनी मारत होता. न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हल्लेखोर रेकॉर्डवरील गुन्हेगार
या घटनेतील (Aurangbad Firing News) आरोपी फय्याज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, घरफोडी, लूटमारीसह दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. घरफोडीप्रकरणी त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली होती. त्याचबरोबर कन्नड पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचा माल जप्त केला होता. तसेच बायजीपुरा परिसरात तो स्वतःला मोठा गुंड असल्याचं भासवत होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share This News
error: Content is protected !!