Aurangabad Suicide

Aurangabad News : औरंगाबाद हादरलं! दीड वर्षांच्या मुलीसमोर शेतकरी दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

2799 0

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad News) पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर एका शेतकरी दाम्पत्याने (Aurangabad News) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गरिबी आणि आर्थिक विवंचनेतून संसाराचा गाडा हाकताना आलेल्या नैराश्यातून या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे. या दाम्पत्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. राजू दामोधर खंडागळे (वय 28) आणि अर्चना राजू खंडागळे (वय 26) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे.

Buldhana Accident : मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू

राजू खंडागळे यांच्याकडे वडिलोपार्जित 2 एकर शेती आहे. तर कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. आईवडील आणि दोघा भावांच्या संसाराचा उदरनिर्वाह 2 एकर शेतीवर भागत नव्हता. त्यामुळे त्यांनी गावातील एका शेतकऱ्याची शेती बटाईने केली होती. मात्र मागच्या वर्षे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आणि यंदा जुलै महिना संपत आला असतांना अपेक्षित पाऊस झाला नाही. अशात आर्थिक तंगीमुळे संसारात ओढाताण होऊ लागली. यामुळे राजू खंडागळे मोठ्या प्रमाणात नैराश्यात होते. याच नैराश्यातून त्यांनी ही आत्महत्या केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही बिडकीन शासकीय रुग्णालयात हलविले, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच बिडकीन ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, बीट जमादार एस. व्ही. वाघमारे, शिवानंद बंगे यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!