Rape

धक्कादायक ! पुण्यात उच्चशिक्षित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

631 0

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख आणि अर्जुन ठाकरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पश्चिम बंगाल येथील 28 वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. ऑनलाइनद्वारे नोकरी शोधत असताना एका तरुणीचा तिला नंबर मिळाला. यानंतर पीडित तरुणीनं तिच्याशी संपर्क केला. यानंतर त्या मुलीने पीडित तरुणीला पुण्यातील हिंजवडीत इंटरव्यूसाठी बोलवले. यानंतर पीडित तरुणी इंटरव्यूसाठी हिंजवडीत आली. यानंतर संबंधित तरुणीने इंटरव्यू ला अवधी असल्याचं सांगून पीडित तरुणीला अर्जुन ठाकरे या व्यक्तीचा नंबर दिला. ते तुला मदत करतील ते चांगले व्यक्ती आहेत, असं सांगितलं. तर आरोपी चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख उपस्थित होते, ते कंपनीचे पार्टनर असल्याचे सांगितलं.

यानंतर महेश रेड्डीने पीडितेच्या समोरच अर्जुन ठाकरे ला 15हजार रुपये दिले. तुला ही मुलगी खुश करेल असे अर्जुन ठाकरे तिच्यासमोर म्हणाला असे तिने आपल्या तक्रारीत म्हंटले. यानंतर आरोपी महेश रेड्डीने पुण्यातीलच ऑफिसमध्ये पीडितेवर बळजबरी केली. यानंतर पिंपरीमध्ये देखील मिटींगचा बहाना करून पीडीतेला बोलवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडितेने हा सर्व प्रकार नूरजहाँला सांगितला. उलट नुरजहाँने मदती ऐवजी सरांना खुश कर असे सांगितले. यानंतर पीडितेकडे असलेले ओळखपत्र, महत्वाची कागदपत्रे महेश्वर रेड्डीने काढून घेतली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तरुणीला महेश्वर रेड्डीने हॉटेलमध्ये बोलावले. यानंतर पीडितेने होकार देत आपला मोबाईल बंद केला.

यानंतर पत्राद्वारे पीडितीने स्वतःला अर्जुन ठाकरेने विकल्याचा आरोप केला. अर्जुन ठाकरे हा तिच्या आजोबांच्या वयाचा असून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु, विश्वासघात करून त्याने तिला पंधरा हजार रुपयात विकल्याचा आरोप केला आहे. अद्याप आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही तरी मला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन तिने पत्राद्वारे पत्रकारांना केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!