Amravati News

Amravati News : अमरावती हादरलं ! गुप्तधनासाठी पायाळू बालकाच्या नरबळीचा प्रयत्न

453 0

अमरावती : अमरावतीमधून (Amravati News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मात्र हा धक्कादायक प्रकार वेळीच उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणात महिलेसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमरावतीमधील टाकळी जहागीरमध्ये हा आघोरी प्रकार घडला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील टाकळी जहागीरमध्ये गुप्तधन शोधण्यासाठी एका पायाळू मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.पोलिसांच्या सर्तकतेमुळं मोठा अनर्थ टळला आहे. 11 ऑक्टोबरच्या रात्री एक वाजता गावातील एक महिलेच्या घरात आघोरी पूजा मांडण्यात आली होती. ग्रामस्थांना या प्रकाराची कुणकुण लागताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना घटनास्थळी आघोरी पूजेचं सामान, हळद, कुंकू, सब्बल चटई, आणि एक बालक आढळून आले. पोलिसांनी हे सर्व सामान जप्त केले आणि त्या बालकाची सुटका करून त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित मुलगा हा मल्हारा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या 6 जणांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या प्रकरणात ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे आणि पोलिसांनी तातडीनं केलेल्या कारवाईचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!