Nashik News

Nashik News : नाशिकमध्ये हत्यासत्र सुरूच; अजून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

599 0

नाशिक : नाशिक (Nashik News) शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये (Nashik News) धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. बबलू सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे समजत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक शहर हादरलं आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नाशिकच्या सातपूर परिसरात धारदार शस्त्रानं सपासप वार करत तरुणाचा खून करण्यात आला आहे. बबलू सोनवणे असं या तरुणाचं नाव आहे, जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. समशेर सिंग असे आरोपीचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वीच हत्येची घटना
दोनच दिवसांपूर्वी अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून एका तरुणावर प्राणघातक हल्ला कोला होता. या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. इंस्टाग्रामवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा वाद झाला होता. या वादातून टोळक्यानं तरुणाची हत्या केली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!