Pune Accident

Pune Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू

4137 0

पुणे : कात्रज – कोंढवा रोड गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा (Pune Accident) सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघाताचे (Pune Accident) सत्र काही थांबायचे नाव घेईना. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ट्रकने दिलेल्या धडकेत एका वृद्ध पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. कोंढव्यातील स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
कात्रज कोंढवा रोड वरील रस्त्यावरील खसलेले चेंबर व MNGL ची रस्त्यात खचलेले लोखंडी झाकण याला हुकवण्यासाठी चालकाने वेगात गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीचा ताबा सुटल्याने शेजारीच चालत असलेल्या पादचाऱ्याच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विष्णू हाणामाय्या अंदरिंकी (वय 61, रा. शिव प्लाझा दशरथ मरळ चौक, सोमजी बस स्टॉप जवळ कोंढवा पुणे) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Share This News
error: Content is protected !!