Viral Video

Viral Video : संतप्त महिलेने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली

974 0

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या ठिकाणचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली आहे. चारचाकी गाडी लावण्यावरुन झालेल्या वादातून संबंधित नेत्याने शिवागीळ केली. यामुळे त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी संबंधित महिलेने पतीची बाजू घेत या नेत्याच्या कानशिलात लगावली.

https://twitter.com/UtkarshSingh_/status/1703651058340544767

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओ बनवणारा व्यक्ती संबंधित नेत्याला त्यांचे नाव विचारतात. त्यावेळी, पांढरे कपडे घातलेली ती व्यक्ती म्हणजे, नाव विचारतो.. मी तुझा बाप आहे, असे म्हणत व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला मारहाणीचाही प्रयत्न या नेत्याकडून होतो. त्यावेळी, तिथेच उभा असलेल्या महिलेकडून त्या नेत्याला मारहाण केली जाते.

माझ्या नवऱ्यावर हात उचलतो, असे म्हणत ती महिला या कथित नेत्याच्या कानशिलात लगावते. दरम्यान, व्हिडिओत गाडी दिसत असून गाडीवर भाजपाचा झेंडा असल्याचे पाहायला मिळते. तसेच, वादग्रस्त भाजप नेता हा माजी नगरसेवक अतुल दीक्षित असल्याचे समजत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!