Accident News

Accident News : भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

415 0

अमरावती : राज्यात अपघाताचे प्रमाण (Accident News) काही थांबायचे नाव घेईना. अमरावती चिखलदरा मार्गावर आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अर्टिगा गाडी थेट 200 फूट खाली कोसळली. हा अपघातामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. या अपघातात 8 पैकी चार लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

या अपघातातील सर्व व्यक्ती हे आदीलाबाद येथील रहिवासी असून ते पर्यटनासाठी चिखलदरा या ठिकाणी आले होते. या अपघाताची माहिती मिळताच चिखलदारा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे. या अपघातात अर्टिगा वाहन क्रमांक एपी 28 डीडब्ल्यू 2119 या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!