BJP

Akola News : पोलिसांनी धिंड काढलेल्या ‘त्या’ गुंडाचा भाजपमध्ये प्रवेश

714 0

अकोला : राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपमध्ये गेल्यास (Akola News) पवित्र होतात, अशी टीका विरोधकांकडून अनेकदा केली जाते. नेते तर पवित्र होतात आता तर गुंडानीदेखील भाजपमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच अकोल्यात (Akola News) कुख्यात गुंड अजय उर्फ अज्जू ठाकूरने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.

कोण आहे अजय उर्फ अज्जू ठाकूर?
अज्जू ठाकूर याची अकोल्यातील (Akola News) कुख्यात गुंड म्हणून ओळख आहे. त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये मारहाण, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. साडेतीन वर्षांपुर्वी, म्हणजे 18 एप्रिल 2020 रोजी याच अज्जू ठाकूरची अकोला पोलीसांनी जठारपेठ भागातून धिंड काढली होती. त्याला भरचौकात खास पोलिसी पाहू़णचार देखील दिला होता. आता त्याने सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Share This News
error: Content is protected !!