Mumbai Crime News : एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची जेलमध्येच आत्महत्या

2297 0

मुंबई : मुंबईतील (Mumbai Crime News) एअर होस्टेस प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपीने अंधेरी परिसरात असलेल्या लॉकरमध्ये आत्महत्या केली आहे. एअर होस्टेस रुपल ओगरे हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केली होती. तो पोलीस कोठडीत होता. त्याने पँटच्या सहाय्याने गळफास घेऊन जेलमध्येच आत्महत्या केली आहे.

रुपल ओगरे या एअर होस्टेसचा तिच्याच बिल्डिंगमध्ये हाउस किपिंगचं काम करणाऱ्या विक्रमने खून केला होता. खून प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.दरम्यान, अंधेरी परिसरात असलेल्या लॉकरमध्ये त्याने गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात नेण्यात आला असून त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

काय होते नेमके प्रकरण?
पवई परिसरात 23 वर्षीय एअर होस्टेसची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. मरोळ येथील राहत्या घरी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. रूपल ओगरे असं हत्या झालेल्या एअर होस्टेसचं नाव आहे. ती एनजी कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. बहीण आणि मित्रासोबत ती रहायला होती. घटनेच्या दिवशी दोघेही गावी गेले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!