Ahmednagar Police

Ahmednagar Police : अहमदनगर पोलिसांनी चक्क एका सॅनिटरी पॅडवरून शोधला खुनी; CID देखील पडली फिकी

913 0

अहमदनगर : आपण सगळ्यांनी CID ही मालिका पाहिलीच असेल. यामध्ये कोणताही पुरावा नसताना CID ची टीम आरोपींचा छडा लावताना आपण पाहिले आहे. मात्र आता अहमदनगरच्या पोलिसांनी (Ahmednagar Police) CID पेक्षा भारी तपास केला आहे. यामध्ये त्यांनी चक्क एका सॅनिटरी पॅडवरून आरोपीचा शोध घेतला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काय आहे नेमके?
अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Police) अकोले तालुक्यातील दुर्गम भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटवण्यासोबतच तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी छडा लावला आहे. चक्क एका सॅनेटरी पॅडवरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातळापूर परीसरात एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पोलीसांना आढळून आला होता. महिलेची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. यानंतर पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. तिचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिची हत्या झाल्याचे तपासात समोर आले.

सॅनिटरी पॅडवरुन असा सापडला खुनी
या महिलेचा जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा त्या मृतदेहाजवळ पोलीसांना पर्समध्ये सॅनिटरी पॅड सापडले. यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला. ही महिला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील असून या महिलेचे नाव कल्याणी महेश जाधव असल्याचे तपासात समोर आले. यानंतर जिल्हा परिषदेच्या मदतीने पोलीसांनी या महिलेच्या घराता पत्ता तसेच इतर माहिती मिळवली. यानंतर पोलिसांनी थेट महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीची चौकशी केली.

पतीनेच केली हत्या
या महिलेच्या पतीने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडीवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांनी (Ahmednagar Police) आपल्या पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पत्नीवर असलेल्या अनैतिक संबधाच्या संशयावरून त्याने आणि त्याचा भाचा मयूर साळवे यांनी खुन केल्याचे कबुल केले. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना या प्रकरणी अटक केली. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना केवळ सॅनेटरी पॅडच्या माध्यमातून आरोपीचा शोध लावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!