Ahmednagar News

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

560 0

अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसांनंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या 27 वर्षे विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
मनीषा दीपक कडणे (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरातील मैदानावर ही दुर्दैवी घटना घडली आहे. मनीषा या नेहमीप्रमाणे शुक्रवारी मैदानावर सरावासाठी आल्या होत्या. मैदानावर व्यवस्थित दोन राऊंड मारल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्रास होत असल्याने त्या खाली बसल्या आणि तिथेच जागेवर कोसळल्या.

मनीषा या खाली कोसळल्याचे लक्षात येताच तिथे असलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. मनीषा कडणे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.त्यांच्या माघारी लहान मुलगा, पती, सासू-सासरे असा संपूर्ण परिवार आहे. त्यांच्यावर चंदनापूरी येथे शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. मनीषा कडणे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhaskar Jadhav : गुहागरमध्ये उद्धव ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा

Dhangar Reservation: धनगर समाजाला मोठा धक्का ! हायकोर्टाने ‘ती’ मागणी फेटाळली

Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

Kavita Chaudhary : उडान फेम प्रसिद्ध अभिनेत्री कविता चौधरी यांचं निधन

Manoj Jarange Patil : पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी केल्या ‘या’ 3 मागण्या

Pimpri-Chinchwad : महानगरपालिकेच्या शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू; पिंपरी- चिंचवडमधील घटना

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!