kotwali police

अहमदनगर हादरलं! बायकोची निर्घृणपणे हत्या करून आरोपीची आत्महत्या

671 0

अहमदनगर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपीने पत्नीची निर्घृणपणे हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अहमदनगर शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरातील ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अहमदनगर शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरात हि धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपी पतीने आधी पत्नीची निर्घृणपणे हत्या केली त्यानंतर आरोपीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. आशा संदीप गुजर असे हत्या करण्यात आलेल्या मृत पत्नीचे नाव आहे तर संदीप रामचंद्र गुजर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी झाऱ्याने मारहाण करून तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत आरोपीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कोतवाळी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!