deccan police station

कोयता गॅंगनंतर पुण्यात टकटक गॅंगचा धुमाकूळ; पुणे पोलिसांपुढे या गॅंगला रोखण्याचे आव्हान

424 0

पुणे : पुणे शहरात मागच्या काही महिन्यांत कोयता गॅंगने दहशत निर्माण केली होती. यानंतर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत या गँगच्या मुसक्या आवळल्या होत्या. तसेच या गँगची लोकांमधील दहशत कमी व्हावी म्हणून पोलिसांनी या गॅंगमधील आरोपींची त्यांच्याच परिसरातून मिरवणूक काढली. यानंतर आता पुणेमध्ये कोयता गॅंगनंतर टकटक गॅंगने दहशत घालायला सुरुवात केली आहे.

या टकटक गॅंगने पुण्यातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या डेक्कन परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या गँगने जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रोड आणि शिवाजी नगर या भागात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हि गॅंग कशाप्रकारे चोरी करते?
या गॅंगमधील सदस्य हे चार चाकी वाहनांना टार्गेट करतात. हे आरोपी चोर कारवर टकटक करतात. यानंतर कारमधील व्यक्तीचे लक्ष विचलित झाले कि ते गाडीतील ऐवज घेऊन पोबारा करत असतात. या प्रकरणी कर्वेनगर भागातील एका 44 वर्षीय व्यक्तीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये चोरटयांनी फिर्यादीचा 40 हजारांचा लॅपटॉप आणि काही कागदपत्रे घेऊन पोबारा केला आहे. त्यामुळे आता या गॅंगमधील आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आव्हान पुणे पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!