Sana Khan

Sana Khan : सना खान हत्येचं गूढ उलगडलं; ‘या’ कारणामुळे पतीनेच केली हत्या

719 0

नागपूर: काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या भाजप नेत्या सना खान (Sana Khan) प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणलं. महत्त्वाचं म्हणजे अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान हिची हत्या केल्याचे कबूल केले आहे. एवढंच नाही तर सना खान यांचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

काय घडले नेमके?
भाजपच्या पदाधिकारी सना खान (Sana Khan) या काही कारणास्तव नागपुरहून पती अमित साहू यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी जबलपुरला जात असल्याची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली होती. तिथं पोहचल्यानंतर सना यांचं आईशी बोलणंही झालं. परंतु जबलपुरला पोहचताच राजूल टाऊनमध्ये अमित साहू आणि सना खान यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर अमितने ढाब्यावरील कर्मचाऱ्यांची मदत घेत सना खानचा मृतदेह हिरन नदीत फेकून दिला. त्याचवेळी नदीला पूर आल्याने घटनेचा भांडाफोड होणार नाही, असंही अमितला वाटलं. परंतु नागपूर पोलिसांनी थेट जबलपूर गाठत घटनेचं गूढ उकललं आहे.

अशा प्रकारे उघडकीस आला गुन्हा
सना खान जबलपुरला गेल्यानंतर संपर्क होत नसल्याने खान कुटुंबियांनी फोनाफोनी करायला सुरुवात केली. परंतु तरीदेखील संपर्क होत नव्हता. अखेर सनाच्या भावाने आरोपी अमित साहुला फोन करत सनाशी बोलण्याचा हट्ट धरला. त्यावेळी ‘आमच्यात भांडणं झाली असून सना माझ्या घरून निघून गेली, ती कुठे गेली मला माहिती नाही’, असं उत्तर अमित साहुने दिलं. त्यानंतर सना खानच्या कुटुंबियांनी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने जबलपूर गाठत प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला.

Share This News
error: Content is protected !!