Shravan Giri Pass Away

Shravan Giri Pass Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचं निधन

2076 0

बीड : ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन (Shravan Giri Pass Away) झाले आहे. बीडमध्ये रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन गिरी यांचा मृत्यू झाला. श्रावण गिरी हे कर्जत येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला गेले होते. काम आटोपून कर्जतला परतत असताना त्यांचा अपघात झाला. बीडमध्ये ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपना ट्रॅव्हल्सनं त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला.

रविवारी संध्याकाळी औरंगाबाद वरून कर्जतला जाण्यासाठी ते बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते. तिथून ट्रॅव्हल्सने जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असताना सपना ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले. चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी तरुणांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे गिरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!