Hingoli News

Hingoli News : ‘ती’ सभा ठरली अखेरची ! घरी परतत असताना तरुणावर काळाचा घाला

637 0

हिंगोली : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील सभेवरून गावाकडे परतत असताना हिंगोलीमधील (Hingoli News) वसमत तालुक्यातील सिंगी या ठिकाणी तरुणाच्या दुचाकीला अपघात होऊन तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात अजून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

काय घडले नेमके?
मंगेश संभाजी काळे (20) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. कळमनुरी तालुक्यात असलेल्या येळेगाव तुकाराम येथील मंगेश संभाजी काळे आणि त्याचा मित्र सचिन बालाजी काळे (20) हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील त्यांच्या सभेसाठी गेले होते. त्यांची सभा झाल्यानंतर दोघे मित्र सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घाई घाईने आपल्या गावाकडे परत निघाले. शनिवारी तारीख 14 रोजी दहा साडेदहाच्या सुमारास अंधारात वसमत तालुक्यातील सिंगी या घाटामध्ये दुचाकी आली असता अंधाराचा अंदाज न आल्याने एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती कि, या अपघातात मंगेशचा जागेवरच मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेला मित्र सचिन हा गंभीर जखमी झाला. या अपघातात पाठीमागे बसलेल्या सचिनच्या हाताला व पायाला गंभीर मार लागल्याने जखमी झाला आहे. अशा अवस्थेत या प्रकाराची माहिती त्याने आपल्या पाठीमागून येणाऱ्या गावातील नागरिकांना दिली. यानंतर गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी असलेल्या सचिन यास उपचारासाठी नांदेडला खाजगी रुग्णालयात पाठवले. यानंतर या अपघाताची माहिती कुरुंदा पोलिसांना देण्यात आली. आपल्या तरुण मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने मंगेशच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!