Accident News

Accident News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; लेकाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

2337 0

मुंबई : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहुर गावच्या हद्दीत अशीच एक अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये डिस्कवरचा अपघात झाला असून यामध्ये आई जखमी तर मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कसा घडला अपघात?
या अपघातात दाभोल गावातील सारीक सिराज खोपटकर (वय 22) व अफरोजा सियाज खोपटकर (वय 55) हे दोघेही गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं होतं . यापैकी सारीक सिराज खोपटकर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली असून आफरोजा सियाज पोपटकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!