Accident News

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

403 0

पुणे : पुणे एक्स्प्रेस वे वर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये टायर फुटून एका खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली आहे. ही बस मुंबईहून पुण्याकडे निघाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधील सगळेच्या सगळे 36 प्रवासी सुखरूप आहेत. बस चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

या खाजगी ट्रॅव्हल्सचे टायर फुटल्याने ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मोठ्या अथक प्रयत्नांनंतर बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. ही आग एवढी भीषण होती कि यामध्ये संपूर्ण बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यामध्ये बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे काही काळ एक्स्प्रेस वे वरील वाहतूक थांबवण्यात आल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!