Sangli Crime

Sangli Crime : सांगली हादरलं ! सांगली बस स्थानकात भरदिवसा रंगला खुनी थरार

871 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Sangli Crime) कवठेमहांकाळ बस स्थानकात किरकोळ कारणावरून महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद झाल्याने एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली आहे. धुळा कोंडीबा कोळेकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भरदिवसा अतिशय वर्दळीच्या ठिकाणी खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
कवठेमहांकाळ येथील बस स्थानकावर शनिवारी दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे शालेय विद्यार्थी व प्रवासी यांची गर्दी होती. यावेळी एस. टी. स्टॅन्डवरील कॅन्टीनच्या जवळील फलाटावर धुळा कोळेकर हा थांबला होता. यावेळी अज्ञात तरुण त्याच्याजवळ आले आणि त्यांनी थेट धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात धुळा कोळेकर हा गंभीर जखमी झाला. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तातडीने मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दीड दोन महिन्यांपासून धूळा कोळेकर आणि काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला होता. एकमेकांकडे रागाने बघितले असल्याची खुन्नस होती. शनिवारी दुपारी पुन्हा त्यांच्यात वाद झाला होता.हाच राग मनात धरून काही संशयित तरुणांनी कोळेकर याला बस स्थानकात गाठून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात धुळा कोळेकर हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे तर एका आरोपीचा शोध सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!