Accident

निशब्द ! हिंजवडीत ट्रकच्या चाकाखाली येऊन तरुणाचा तडफडून मृत्यू

57863 0

पुणे : पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी गाड्यांची रेलचाल असते. हा परिसर नेहमी गजबजलेला असतो.या परिसरात आज सकाळी कामावर निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये एका भरधाव ट्रकने या तरुणाच्या बाईकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की हा तरुण ट्रकच्या मागच्या चाकाखाली अडकला. त्याच्या पोटावरून ट्रकचे चाक गेले.

हा अपघात झाल्याचे समजताच ट्रक चालकाने घटनास्थवरून पळ काढला. हा तरुण 20 मिनिटे मला वाचवा अशी याचना करत होता. यानंतर काही नागरिकांनी ट्रक ढकलून बाजूला करून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हा अपघात आज सकाळी 7.30 च्या सुमारास हिंजवडीमधील लक्ष्मी चौकात झाला. रामदास दिगंबर वडजे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामदास याचा भाऊ संजय वडजे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून ट्रकचालक रंगनाथ तांबे याला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!