Suraj Kalbhor

पिंपरी चिंचवड हादरलं ! भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या

1678 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सूरज काळभोर असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या सासुरवाडीतच त्याचा खून करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गहुंजे येथिल शेतात त्याचा खून करण्यात आला.

धक्कादायक म्हणजे मृत सूरज काळभोर याचे महिन्याभरापूर्वीच लग्न झाले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!