Accident

अरुंद पुलाचा अंदाज न आल्याने ट्रकचा भीषण अपघात

1531 0

अकोला : अकोला (Akola) जिल्हातल्या बाळापूर (Balapur) तालुक्यातील वाडेगाव ते बाळापुर रोडवर एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये वाडेगाव (Wadegaon) कडून इटारसीकडे (Itarsi) जात असताना मांडवा फाटाच्या पुढे असलेल्या वघाडी नाल्यावरील अरुंद पुलाचा अंदाज न आल्याने पुलावरून ट्रक खाली पडून अपघात झाला. या अपघातात ट्रक ड्रायवर आणि क्लीनर हे गंभीर जखमी झाले तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हा अपघातग्रस्त ट्रक वाडेगाव येथील व्यापाऱ्याची तूर इटारसीला घेऊन जात होता. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या अपघातात गाडीचा चालक आणि क्लिनर जखमी झाल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास करण्यात येणार आहे. तसेच ट्रकमधील तूर दुसऱ्या वाहनाने हलवण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!