Accident News

Accident News : लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात ट्रक शिरला

960 0

लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर असलेल्या दोन चिक्की विक्री दुकानात ट्रक शिरल्यामुळे मोठा अपघात (Accident News) झाला आहे. शनिवारी ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काय घडले नेमके?
याप्रकरणी ट्रकचालक सहदेव नाथा सूर्यवंशी (वय 48, सध्या रा. नवी मुंबई, मूळ रा. माजलगाव, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दिवसा जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ट्रकचालक सूर्यवंशी सकाळी साडेअकराच्या सुमारास खंडाळ्याकडे निघाला होता. पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर वळणावर ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला. हा ट्रक थेट चिक्की विक्री करणाऱ्या दुकानात शिरला.

प्रसंगावधान राखून ट्रकचालकाने ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. दुकानात शिरलेला ट्रक मागे घेण्यात येत होता. त्यावेळी ट्रकने एक मोटार आणि दुचाकीला धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले.

Share This News
error: Content is protected !!