Pune Crime News

Pune Crime News : निर्जनस्थळी नेऊन तरुणीचे कपडे काढण्याचा प्रयत्न, विरोध केल्यावर….; पुण्यातील धक्कादायक प्रकार

924 0

पुणे : पुण्यामध्ये (Pune Crime News) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका महिला प्रवाशावर बलात्काराचा (Rape) प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी (Pune Crime News) रिक्षा चालकाने आधी महिलेला निर्जनस्थळी नेलं आणि नंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वानवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Suicide News : धाराशिव हादरलं! FB Live करून तरुणाने आपले आयुष्य संपवले; नेमके काय घडले?

काय आहे नेमके प्रकरण?
ही धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हदीत घडली आहे. यामध्ये प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका तरुणीवर रिक्षा चालकानेच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. 20 जून रोजी काळेपडळ येथील रेल्वे गेटच्या जवळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनिकेत रिशू कुमार (वय 24, शिवचैतन्यनगर, फुरसुंगी) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे.पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime : पुणे हादरलं ! शिक्षीका पत्नीचा खून करून दोन मुलांना विहरीत टाकून डॉक्टर पतीची आत्महत्या

पीडित तरुणी पुण्यातील (Pune Crime News) एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच 20 जून रोजी काम संपवून घरी निघाली होती. यावेळी ती आरोपी रिक्षा चालकाच्या रिक्षात बसली होती. पण आरोपीने यावेळी नेहमीच्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने रिक्षा नेली. रिक्षाचालक तरुणीला घेऊन वर्दळ नसणाऱ्या ठिकाणी गेला. यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवली आणि तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हाताने तरुणीचं तोंड दाबून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याला पीडित तरुणीने विरोध केला असता त्याने तरुणीच्या अंगावर बसून अश्लील चाळे केले. यानंतर पीडित तरुणीने आरोपीच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका केली आणि थेट वानवडी पोलिसांत धाव घेतली. वानवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!