एक फोन अन् झीशान सिद्दिकींचा वाचला जीव; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येअगोदरची संपूर्ण इनसाईड स्टोरी

924 0

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत असून बाबा सिद्दिकी यांच्यासोबत त्यांचा आमदार मुलगा झिशान सिद्दिकी यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता अशी माहिती आता समोर आली.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलिवुड आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.शनिवारी सायंकाळी बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी हे बांद्र्याच्या निर्मलनगरमधील ऑफिसमध्ये बसलेले होते. फटाक्यांची आतिषबाजी झाल्यावर सिद्दिकी घरी जाणार होते. यानंतर ते ऑफिसमधून निघाले. फटाके सुरु असल्याने त्यांची कार तिथेच थांबली. तिथे तिघेजण आले, त्यांचा चेहरा झाकलेला होता. त्यांनी सिद्दिकी यांच्यावर गोळ्या चालविण्यास सुरुवात केली. या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला.झिशान सिद्दिकी देखील बाबा सिद्दिकींसोबत घरी जाणार होते. ते ऑफिसबाहेर निघालेच होते इतक्यात झिशान यांना फोन आला व ते पुन्हा ऑफिसमध्ये गेले. फोनवर बोलत असताना त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकायला आला. ते बाहेर आले तर त्यांचे वडील जमिनीवर पडलेले होते व जमाव हल्लेखोरांना पकडत होता. फोन आला नसता तर झिशान सिद्धिकी देखील हल्लेखोरांच्या कचाट्यात आले असते.
लॉरेन्स गँगने ही हत्या घडवून आणली असून यासाठी सुपारी देण्यात आली होती. गोळीबार करणारे तिघे आरोपी गेल्या महिनाभरापासून कुर्ल्यामध्ये रहायला आले होते. सिद्दिकी यांच्या घराची, ऑफिसची रेकी करण्यात आली होती. यानंतर शनिवारी सायंकाळी देवीच्या विसर्जनाच्या फटाक्यांच्या आवाजात सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

Share This News
error: Content is protected !!