Beed:

अल्पवयीन मावस भावाने बहिणीला धमकावलं, तोंडाला रुमाल बांधला अन्…; पुणे शहरात एकच खळबळ

203 0

पुण्यातून दररोज महिला अत्याचारांच्या गंभीर घटना समोर येत आहे. अशीच एक गंभीर घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं समोर आलं आहे. घरात एकटा असलेल्या अल्पवयीन बहिणीवर अल्पवयीन मावस भावाने चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार सप्टेंबर महिन्यामध्ये घडल्याचं फिर्यादित म्हटलं आहे. याप्रकरणी आरोपी मावस भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजेच पीडित मुलीचा मावस भाऊ आहे. फिर्यादी या आपल्या मुलीला एकटीला घरी ठेवून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी घरात असलेल्या मावस भावाने चाकूचा धाक दाखवत मुलीच्या तोंडाला रुमाल बांधला. जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने कोणालाही याबाबत सांगितलं नाही मात्र तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मुलीच्या आईने तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!