Crime News

Crime News : हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देणे पडले महागात; टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

578 0

बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा गदर-2 या चित्रपटला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. देशात अनेक राज्यात या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहेत. मात्र असे असताना छत्तीसगढ राज्यात एक धक्कादायक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये गदर-2 चित्रपट पाहून आलेल्या युवकाला हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देणे महागात पडले आहे. हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या तरुणाची टोळक्याकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मलकित सिंह असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आयटीआय मैदानात शनिवारी संध्याकाळी 2 मुलं मोबाइलवर अभिनेता देओलचा गदर-2 हा चित्रपट ऑनलाइन पाहत होते. त्याचवेळी मलकित सिंह उर्फ वीरुने चित्रपट पाहत असतानाच हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्याचवेळी त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तरुणाच्या एका टोळक्याला वीरुचा राग आला. तिथे असलेल्या चार ते पाच जणांनी विरुला बेदम मारहाण केली. तर, विरुच्या मित्राला चाकुचा धाक दाखवून गुडघ्यांवर बसवून ठेवलं होतं. मित्रासमोरच विरुला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्याला गंभीर जखमी केले.

यानंतर या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मलकीतला रात्री रायपूर येथील रामकृष्ण केयर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मलकितसोबत घडलेल्या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी पथक तैनात केली होती. अखेर शनिवारी दुपारी 1 वाजता आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!