Mumbai Suicide

Mumbai Suicide : वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार थांबवून तरुणाची आत्महत्या; सर्च ऑपरेशन सुरु

644 0

मुंबई : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवर आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना (Mumbai Suicide) घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न (Mumbai Suicide) केला आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या व्यक्तीचे सर्च ऑपरेशन केलं जात आहे. मुंबई पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड एकत्रितपणे त्याचा शोध घेत आहेत.

काय घडले नेमके?
ही व्यक्ती कारने वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन जात होती. सी–लिंकच्या मधोमध पोहोचल्यानंतर त्याने कार थांबवली आणि थेट समुद्रात उडी मारली. वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळताच कोस्ट गार्ड यांच्यासह मुंबई पोलीस आणि नौदलाने सर्च ऑपरेशन सुरु केलं. सर्च ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरचादेखील वापर केला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकवरुन याआधीही अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न (Mumbai Suicide) झाला आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती.यानंतर सी-लिंकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!