'मी नगरसेवक आहे, मला तू आवडतेस', असं म्हणत पुण्यातील महिलेचा विनयभंग

PUNE CRIME: ‘मी नगरसेवक आहे, मला तू आवडतेस’, असं म्हणत पुण्यातील महिलेचा विनयभंग

447 0

पुण्यातील एका महिलेला फोनवर नगरसेवक बोलत असल्याचं सांगून तिचा विनयभंग ( molestation) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फोन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police) दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटना ही ८ डिसेंबर रोजी सकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी महिलेला एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन कॉल आला. कॉल उचलल्या नंतर एक पुरुष बोलू लागला, ‘हॅलो, मी पुणे महानगरपालिकेतील वडगाव शेरीचा नगरसेवक बोलतोय. मला तू आवडतेस, मला तू पाहिजे. बाकीचे काहीच बोलू नकोस. तू फक्त एस ऑर नोमध्ये उत्तर दे, नाही तर मी उद्या तुझ्या भाजीच्या दुकानावर येतो.’

हे ऐकताच या महिलेने कोण बोलत आहे ? तुम्हाला नंबर कोणी दिला अशी विचारणा केली. त्यावर त्या व्यक्तीने ‘ते तुला कशाला सांगू, तुला पुढे कळेलच. माझ्या आवडत्या व्यक्तीचा नंबर मी कसा पण काढू शकतो’, असं उत्तर दिलं. त्यावर या महिलेने रॉंग नंबर म्हणून फोन कट केला. मात्र त्यानंतरही हा इसम वारंवार या महिलेला फोन करून मी तुझ्या भाजीच्या दुकानावर येतो, असं म्हणत राहिला. अखेर या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंद केली. त्यावरून या इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा इसम खरंच नगरसेवक आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!