लॉजच्या रूममधून येत होता मोठ्याने आवाज, दरवाजा तोडताच दिसली रक्तबंबाळ प्रेयसी; नेमकं प्रकरण काय वाचा सविस्तर

146 0

प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी – चिंचवडमध्ये घडली आहे.

नितेश नरेश मिनेकर (वय- 34 रा. येरवडा) असं आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव असून त्याची 28 वर्षीय प्रेयसी गंभीर जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण आपल्या प्रेयसीला घेऊन दुपारी चारच्या सुमारास राज प्लाझा लॉज येथे आले होते. त्यांनी या लॉजमध्ये रूम बुक केली होती. रूम मध्ये गेल्यानंतर काही वेळातच या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. भांडणाचा आवाज रूमच्या बाहेर पर्यंत येऊ लागला. हे ऐकून हॉटेल मॅनेजरने 112 नंबर वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. काही वेळात पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला. त्यावर नितेशने, मी कपडे घालतोय थोड्या वेळात दरवाजा उघडतो, असं उत्तर दिलं. बराच वेळ झाल्यानंतरही दरवाजा उघडला गेला नाही. त्यातच आतून येणारा नितेशचा आवाजही बंद झाला.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी थेट दरवाजा तोडला. तर आत गेल्यानंतर थरकाप उडवणार दृश्य पाहायला मिळालं. नितेशची प्रेयसी ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर नितेशने स्वतः गळफास घेतला होता.‌ या तरुणीला लागलीच यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती चिंताजनक आहे. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. हा गुन्हा प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तवला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!