Satara Crime

Satara Crime : पाटण- पंढरपूर मार्गावर आढळला मृतदेह

1009 0

सातारा : पाटण- पंढरपूर राज्यमार्गावर (Satara Crime) चरेगाव (ता.कराड) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, सदरचा अपघात रात्रीच्या सुमारास झाला असून धडक दिलेल्या वाहनधारकाने सदर व्यक्तीस उचलून रस्ताकडेला ठेवले अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.सविस्तर माहिती अशी कि, चरेगाव (ता. कराड) येथे सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मागासवर्गीय वस्तीमधील आनंदा बापू कांबळे (सुतार) हे नेहमीप्रमाणे रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी पवार मळा रोड येथे गेले होते. त्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी फिरायला गेलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला.

या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय कराड येथे पाठवला आहे. उंब्रज पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!