तरुणाला ब्लॅकमेल करुन त्याच्या मालमत्तेवर महापालिकेने कारवाई न करण्यासाठी तसेच अॅट्रोसिटीसारख्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ६० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश भगवानराव चव्हाण, रुग्ण हक्क परिषेदच्या अध्यक्षा अपर्णा साठे (वय ३८, रा. नारायण पेठ) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.