Suicide

धक्कादायक ! पुण्यात सुसाईड नोट लिहून बी.ए.च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

3757 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणार्‍या विजय नांगरे या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या (Sucide) केल्याची घटना आज घडली आहे.वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरील अभ्यासिकेतील पंख्याला गळफास लावून त्याने आत्महत्या केली आहे.

मृत विजय हा मॉडर्न महाविद्यालयात (Modern College) बी. ए. च्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठवला आहे. विजयने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास विश्रांतवाडी पोलीस (Vishrantwadi Police) करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!