Dombivli News

Dombivli News : धक्कादायक ! खेळता खेळता अचानक 5 वर्षीय चिमुकल्याचा झाला मृत्यू

598 0

डोंबिवली : डोंबिवलीमधून (Dombivli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खेळता खेळता 5 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. डोंबिवली मधील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये खेळत असताना तोल जाऊन पहिल्या मजल्यावरुन पडून या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

काय घडले नेमके?
सक्षम उंडे असे मृत्यू झालेल्या चिमूरड्याचे नाव आहे. सक्षम हा भरत उंडे यांचा एकुलता मुलगा होता. सक्षम हा कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मधील प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला होता. पहिल्या मजल्यावर असलेल्या प्ले झोन मध्ये खेळत असताना तो अचानक खाली पडला. ही गोष्ट कामगारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सक्षमला तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!