Ajinkya Kadam

Ajinkya Kadam : बॉडी बिल्डर अजिंक्य कदमचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू

16412 0

नालासोपारा : मुबईतील नालासोपारा याठिकाणी अजिंक्य कदम (Ajinkya Kadam) या 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तो नालासोपारा पूर्व मोरे गाव आरंभ कॉलनीमध्ये राहत होता. सोमवारी सकाळी अचानक त्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

अविवाहित असलेल्या अजिंक्यने 75 kg वजनात आपल्या बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून, पालघर जिल्ह्यात विविध पारितोषिक मिळवली होती. त्याच्या माघारी आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असून मुलांमध्ये घरात तो मोठा होता. घरातील मोठा मुलगा अचानकपणे कायमचा निघून गेल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!