Death

Shawarma : धक्कादायक ! शॉरमा खाणे तरुणाच्या जीवावर बेतले

959 0

शॉरमा (Shawarma) हे मध्य पूर्वेतील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, ज्याची भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र याच शॉरमामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. “शॉरमा” खाल्ल्याने विषबाधा झाल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत व्यक्तीचे नाव राहुल (वय 22 ) आहे. तो कोट्टायम जिल्ह्यातील टीकोयचा रहिवासी आहे.

काय घडले नेमके?
त्याने 18 ऑक्टोबर रोजी येथील एका हॉटेलमधून ऑनलाइन ऑर्डर केलेला शॉरमा खाल्ल्यानंतर त्याची तब्बेत बिघडली. रविवारपासून त्याच्यावर कोचीजवळील कक्कनाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी सोमवारी मावेलीपुरममधील हॉटेलविरुद्ध तरुणाच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दुसऱ्या दिवशी पालिका अधिकाऱ्यांनी हॉटेलवर कारवाई करत ते बंद केले.

Share This News
error: Content is protected !!