Pratap Sarnaik

Pratap Sarnaik : आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

733 0

ठाणे : आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीचा व्यवहार करण्यासाठी सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडून आरोपीनं पैसे घेतले होते. मात्र जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता पैसेही परत दिले नसल्याचा सरनाईक यांनी आरोप केला आहे.

मार्टिन अ‍ॅलेक्स बर्नार्ड कोरिया असे आरोपीचे नाव आहे. काशीमीरा पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.2021 पासून आतापर्यंतच्या काळात ही फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. घोडबंदर रोडवरील एक जमीन सरनाईक यांना घ्यायची होती. त्यासाठी या जमिनीचा व्यवहार होणार होता. मात्र आरोपीने त्यांची फसवणूक केली आहे.

सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यासोबतच्या व्यक्तीनं तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे हप्तेही आरोपीने भरले नसल्याचं समोर आलं आहे. प्रताप सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे.

Share This News
error: Content is protected !!