5 Years Old Boy Died

5 Years Old Boy Died : हृदयद्रावक ! एक चुक घडली अन् क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

734 0

जालना : आजकाल जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल असतो. पालकसुद्धा आपल्या मुलाने शांत बसावे दंगा करू नये म्हणून लहान वयातच आपल्या मुलांना (5 Years Old Boy Died) खेळण्यासाठी मोबाईल देतात. मात्र, या गोष्टीचा जेवढा फायदा आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक तोटा आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना जालन्यामध्ये घडली आहे. ज्यात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावामध्ये घडली आहे. समर्थ परशुराम तायडे असे मृत पावलेल्या बालकाचं नाव आहे. कुंभारी या ठिकाणी एका नातेवाईकाचा तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाला होता. कार्यक्रम आटोपून 4 मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमठाणा येथे परतणार होतं. घरी परतण्यापूर्वी त्यांचा मुलगा समर्थ हा इतर मुलांबरोबर खेळत होता. खेळताना चिमुकल्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि जीवनाला मुकला.

काय घडले त्या चिमुकलीसोबत?
खेळत असताना मोबाईलची खराब बॅटरी या 5 वर्षीय मुलाने कानाला लावली. त्याच क्षणी त्याचा अतिशय भयानक स्फोट झाला. यात समर्थच्या कानाला आणि हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आपल्या मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूने तायडे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भोकरदन पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide