Nagpur News

Nagpur News : धक्कादायक ! गुड बाय एव्हरीवन, स्टेटस ठेवून 25 वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

634 0

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सीताबर्डीच्या तेलीपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिला जिम ट्रेनरने गळफास लावून आत्महत्या (Nagpur News) केल्याची घटना घडली. योगिनी सतीश लाडेकर असे आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय जिम ट्रेनर तरुणीचे नाव आहे. योगिनीचे आई-वडील आणि कुटुंब गिट्टीच्या परिसरातील मानवता नगर येथे राहतात. तिला तिच्या घराभोवतीचे वातावरण आवडत नव्हते. यामुळे योगिनी आपले घर सोडून बर्डी तेलीपुरा बुरड गल्ली येथील पाताळवंशी नावाच्या व्यक्तीच्या घरात भाड्याने राहत होती. या ठिकाणी तिच्यासोबत आणखी 3 मुली राहत होत्या. त्या सगळ्या नोकरी करत होत्या.

घटनेच्या दिवशी योगिनी हिच्याबरोबर राहणाऱ्या पोरी कामावर गेल्या होत्या. योगिनी खोलीत एकटीच होती. त्याचवेळी तिने पंख्याला स्कार्फ बांधून गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या मैत्रिणी कामावरून खोलीत परत आल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. योगिनीने आत्महत्या करण्याआधी आपल्या मोबाइलवर “गुड बाय एव्हरीवन”, असे स्टेटस ठवले होते. हे स्टेटस पाहताच तिच्या मित्रांनी तिच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

Satara News : ‘खूप केलं माणसांसाठी आता बस्स’… व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

या घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय नेमाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून योगिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासादरम्यान, पोलिसांना कळले की योगिनीला मायग्रेन आणि पोटाचा आजार झाला असून त्यावर बराच काळ उपचार सुरू होते, मात्र आराम मिळत नव्हता. त्यामुळे तिने या आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!