Buldhana Crime News

Buldhana Crime News : बैलांना चारा टाकण्यासाठी गेले आणि समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली

43566 0

बुलढाणा : बुलढाण्यामध्ये (Buldhana Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Buldhana Crime News) एका तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आजकालची तरुण पिढी कोणत्या तरी छोटयाशा कारणावरून आपल्या आयुष्याचा शेवट करताना दिसत आहे. अशीच काहीशी धक्कादायक घटना बुलढाण्यामधील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु. या ठिकाणी घडली आहे.

काय घडले नेमके?
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु येथील एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गोठ्यातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अशोक कलाजी लिपने असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अशोकचे वडील कलाजी लिपने यांनी 8 ऑगस्टच्या रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास बैलांना चारा टाकण्यासाठी ते गोठ्यावर गेले. यावेळी समोरील दृश्य पाहून त्यांना हादराच बसला. त्यांचा मुलगा अशोक गोठ्यातील अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला.

मुलाला त्या अवस्थेत बघितल्याने त्यांनी हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याच्या आवाज ऐकून अशोक दहातोंडे, नंदलाल आटोळे, विनायक काकडे, संजय लिपने यांनी गोठ्याकडे धाव घेतली. यानंतर अशोकच्या गळ्यातील दोर सोडून त्याला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहीकेतून सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी (Buldhana Crime News) किनगाव राजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अशोकने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार शरद ठोंबरे, रमेश गोरे, सलिम परसुवाले, सुभाष गिते हे करीत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!