Sangli News

मिरजेत गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाने केले ‘हे’ भयानक कृत्य; जिल्हा हादरला

1491 0

सांगली : सांगलीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये सांगलीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction) करुन तिला मिरजेत नेऊन तिच्यावर अत्याचार (Sexual Assault) करण्यात आले. यानंतर तिचा गळा चिरुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाने हे भयानक कृत्य केले आहे. या प्रकरणी मिरजेतील (Miraj) तरुणाविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

गांजाच्या नशेत आरोपीचं कृत्य
प्रसाद मोतुगडे माळी (वय 20 वर्षे, राहणार ब्राह्मणपुरी मिरज) (Prasad Motugade Mali) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपीने पीडित मुलीचं रिक्षातून अपहरण केलं. त्यानंतर तिला मिरजमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. यानंतर तिच्यावर गळ्यावर कटरने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गांजाच्या नशेत हे कृत्य केले.

मुलीवर उपचार सुरु
आरोपीने केलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

आरोपीचा शोध सुरु
मिरज शहर पोलिसात आरोपी प्रसाद मोतुगडे माळी याच्याविरोधात अपहरण, पॉक्सो, ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!