Buldhana News

Buldhana News : देश सेवेचे स्वप्न राहिलं अधुरं !19 वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

1316 0

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावामधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये गणेश विष्णू लोणकर या 19 वर्षीय तरुण युवकाचा अकस्मित मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गणेश हा सैन्य भरतीची तयारी करत होता. तो दररोज सकाळी उठून गावातील लगतच्या रस्त्यावर धावायचा आणि सैन्य भरती करता करावा लागणारा व्यायाम करत होता.

भरतीसाठीची सर्व पूर्व तयारी तो दररोज सकाळी उठून करत होता. त्यामध्ये धावण्याचा देखील समावेश होता. गणेश चतुर्थीच्या दिवशी 19 सप्टेंबर रोजी गणेश नेहमी प्रमाणे आपले नित्यक्रम व्यायाम करून झाल्यानंतर घरी आला. यानंतर त्याने चहा पाणी घेत असताना तो अचानक कोसळला. यानंतर त्याला कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गणेश हा आई-वडिलांना एकुलता एकच होता. सैन्य भरती होऊन देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र त्याच्या आकस्मित निधनाने त्याचे हे स्वप्न अधुरंच राहिले आहे. गणेशच्या अकाली जाण्याने संपूर्ण गाववर शोककळा पसरली आहे. तसेच गणेशच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेशच्या माघारी आई-वडिल आहेत. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी गणेशच्या मोठ्या भावाचे विजेचा धक्का लागून आकस्मित निधन झाले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!