Nashik News

Nashik News : नियतीचा खेळ ! 17 वर्षीय तरुणाने अचानक आपल्या आयुष्याचा केला शेवट

1134 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सातपूर येथील (Nashik News) कामगार नगरमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षीय मुलाने मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कृष्ण विनोद सिंग (रा. कामगार नगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
कृष्ण हा बारावीत शिकत होता. तो लॅपटॉपवर शेअर मार्केटिंग करायचा. तो आई आणि भावासमवेत सातपूरमध्ये वास्तव्यास होता. त्याने अधिक मासानिमित्त सोमवारी उपवाससुद्धा केला होता. तो नेहमीप्रमाणे मंगळवारी लॅपटॉपवर काम करत होता. आई कामानिमित्त कंपनीत गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी बघून त्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

ही गोष्ट त्याच्या घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत. कृष्ण हा आई आणि भावासोबत राहत होता. त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचललं हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे कृष्णच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!